कृषी वार्ताप्रभात
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख
पुणे – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता मिळविण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी शासनाने 30 नोव्हेंबर 2019 अंतिम तारीख निश्चित केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, आसाम व मेघालयातील शेतकऱ्यांना ही मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत आधारकार्ड लिंक करता न आल्यास 6 हजार रूपयांची आर्थित मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत 7.63 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र, यापैकी 3.69 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा तिसरा हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे सुमारे 7 कोटी शेतकरी या योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. कागदपत्रांचा घोळ व आधारकार्ड लिंक झाले नसल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. _x000D_ संदर्भ – प्रभात, 12 नोव्हेंबर 2019 _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
210
0
संबंधित लेख