कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
डीएपी व एनपीके खताच्या किंमतीमध्ये ५० रू. कमी झाले
इफकोने डीएपी व एनपीकेच्या खताच्या किंमतीमध्ये प्रति पोत्यामागे ५० रू. कमी आकारणार आहे. पहिले एनपीकेच्या खताची किंमत १३६५ रू. होती, यामध्ये घट होऊन ती १२५० रू. केली होती. आता यामध्ये ५० रू. घट होऊन १२०० रू. केले आहे. एनपीके-ll च्या किंमती १२६० मध्ये घट होऊन १२१० व एनपीच्या किंमतीत १००० रू. घट करून ९५० रू. केले आहे. डीएपीच्या किंमती पूर्वी १४०० रू. होते, यामध्ये घट करून १३०० रू. केले होते. आता यामध्ये ५० रू. घट करून याची किंमत १२५० रू. केले आहे. डीएपीचे पूर्ण नाव डाइअमोनियम फॉस्फेट आहे. या खतामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाण फॉस्फरसचे असते. डीएपी जमिनीची खत क्षमता वाढविण्यासोबतच त्याला पावडरसारखी बनविते, जे की मुळांना पसरविण्यासाठी मदत करतात. जेव्हा मुळे मजबूत होतात, तेव्हा फळे जास्त लागतात. एनपीके खतांमध्ये नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम एकत्रित असतात. हे रोपे व फळांना मजबूत करतात. या खतांच्या प्रयोगाने फळ गळती होण्याची समस्या कमी होती. दोन्ही खते ही दाणेदार असतात. याचा वापर पिकांच्या लागवडीवेळी केला जात असल्याने, रोपांची तणे मजबूत व मुळे जमिनीत आधिकाधिक पसरतात. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
214
0
संबंधित लेख