AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jun 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात या आठवडयात पाऊस सुरू होईल
राज्यावरील हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी होत असून, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. ९ जूनला राज्याच्या पूर्व, पश्चिम व मध्य भागावर १००२ हेप्टापास्कल कमी हवेचा दाब राहिल्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल. ८ व ९ जूनला कर्नाटक किनारपट्टी पार करून मान्सून उत्तर दिशेने कोकण किनारपट्टी व्यापून ११ जूनला मुंबईसह कोकणात व दक्षिणेकडील भागात पाऊस सुरू होईल. १२ जूनला कोकणच्या दिशेने चक्राकार वारे वेगाने समुद्र किनारपट्टीच्या दिशेने ढगांचा समूह आणतील त्यावेळी कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरूवात होईल. १३ जूनलादेखील कोकण व पश्चिमकडील भागात मान्सून पावसाचा जोर सुरू राहील. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तरकडील भाग, विदर्भ या ठिकाणी १४ व १५ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल व पाऊस सुरू होईल. १६ जूनला राज्याचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापेल, आशा प्रकारे मान्सूनच्या वाटचालीसाठी या आठवडयातील हवामान घटक अनुकूल राहतील.
कृषी सल्ला: १.या आठवडयात राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, जमिनीत ६५ मिली ओलावा निर्माण झाला की पेरणी सुरू करावी. धुळ वाफ पेरणी टाळावी. कारण पावसात मोठी उघडीप झाल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येते. २.कोरडवाहू भागात उताराला आडवे सारे पाडावेत. कारण यामुळे जल व मृद संधारण होईल. ३.शक्यतो प्रथम कडधान्याच्या पेरण्या कराव्यात. ४.कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके व त्यांच्या कमी कालावधीच्या जातींची पेरणी करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे हवामानविषयक महत्वाची माहिती फेसबुक, व्हाॅट्सअ‍ॅप व एसएमएसवर नक्की शेयर करा
333
1