AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Mar 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वाढ
बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये २.६२ टक्क्यांची वाढ होऊन ३३.६५ लाख टन झाली आहे. बांगलादेशसहित इतर देशांतून आयातची मागणी कमी प्रमाणात झाल्याने चालू वित्त वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या दहा महिन्यात एप्रिल ते जानेवारी दरम्यान बिगर बासमती तांदूळ निर्यातीमध्ये १५.४५ टक्क्यांनी घट होऊन एकूण निर्यात ६१.२१ लाख टन झाली आहे. त्याचबरोबर या दरम्यान बासमती तांदळाची निर्यात २.६२ टक्क्यात वाढ होऊन ३३.६५ लाख टन झाली आहे. एपीडाच्या एका वरिष्ठ अधिकारीच्या मते, मागील आर्थिक वर्षात बांगलादेशने बिगर बासमती तांदळाची आयात मोठया प्रमाणात केली असल्याने, चालू वित्त वर्षात बांगलादेशजवळ या तांदळाचा पुरवठा जास्त प्रमाणात असल्याने आयात कमी झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात बासमती तांदळाची निर्यात चालू वित्त वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या दहा महिन्यात म्हणजेच एप्रिल ते जानेवारी या दरम्यान २.६२ टक्क्यांची वाढ होऊन ३३.६५ लाख टन झाली आहे. या तुलनेत मागील वर्षी २०१७-१८ मध्ये हीच निर्यात ३२.७९ टन झाली होती. मुल्यच्या दृष्टीने, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये बासमती तांदूळाची निर्यात २४.९१९ कोटी रुपये झाली होती. या तुलनेत मागील वर्षी २०१७-१८ मध्ये २१,३१९ करोड रू. निर्यात झाली होती. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
36
0