AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
31 Jan 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू व डाळिंब ही फळे तडकण्याचे कारणे आणि उपाय
कधीकधी फळे काढणीपूर्वी किंवा पक्वतेच्या वेळी तडकलेली असतात. ही फळे असणारे झाडे अन्नद्रव्य कमतरता असणारी फळझाडे मानले जाते. या फळामध्ये बुरशी किंवा जीवाणूंचा प्रवेश होऊन ही फळे सडतात. जसे की, लिंबू फळ तडकणे, डाळिंब फळे तडकणे. फळे तडकण्याचे कारणे - • अचानक वातावरणात होणारे बदल. • बोरॉन, कॅल्शिअमची किंवा नत्राची असणारी कमतरता. • बिगर मोसमी व अचानक उन्हाळ्यात पडणारे पाऊस. • जिबरलिक अॅसिडची असणारी कमतरता. • थेट सूर्यप्रकाशचा फळांवर पडणारा प्रभाव. • वातावरणातील तापमानात अचानक होणारे बदल.
उपाय - • प्रभावी सिंचनप्रणालीचा अवलंब करावा. • पावसाचे पाणी किंवा फळ झाडांना पाणी दिल्यावर बागेत पाणी साचता कामा नये. पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. • पोषक कमतरता टाळण्यासाठी, बोरॅक्स ०.०२%, तांबे सल्फेट ०.०३% आणि पोटॅशियम सल्फेट २% लिंबु बागेमध्ये फवारणी करा. याव्यतिरिक्त, एनएए @ २० पीपीएम आणि जिब्रेलिक अॅसिड @ १० पीपीएम फवारणीदेखील करा. • जूनमध्ये बोरॅक्सची @ १% डाळिंबावर तसेच जिब्रेलिक अॅसिडची @१२० पीपीएम फवारणी करावी. • बागेमध्ये शास्रीय पद्धतीने अंतरमशागत करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
378
163