AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Apr 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
आतापर्यंत, फक्त १७.४४ लाख टन साखर निर्यात झाली
विदेशी बाजारपेठेत साखरेची किंमत कमी झाल्याने निर्यात मर्यादित प्रमाणात होत आहे. पहिले ऑक्टोबर २०१८ पासून चालू पेरणी हंगाम २०१८-१९ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) दरम्यान ६ एप्रिलपर्यंत १७.४४ लाख टन साखरेची निर्यात झाली, पण केंद्र सरकारने ५० लाख टन निर्यात करण्याचे ठरविले होते.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशननुसार, पहिला ऑक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०१९ पर्यंत एकूण निर्यातीमध्ये ७,७९,९८३ टन कच्ची साखर किंवा ९,१२,४५८ टन पांढरी साखर आहे. आतापर्यंत, एकूण निर्यातमध्ये बांग्लादेश देशाचा 20 टक्के हा सर्वाधिक वाटा आहे. बांग्लादेशने ३,५६,७२८ टन साखर आयात केली आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका या देशाने २,८७,४९८ टन, सोमालियाने २,१२,७६० टन व ईरानने १,१२,५०० टन साखर आयात केली आहे. अन्य देशांनी ६,३२,१३८ टन साखर आयात केली आहे. संदर्भ- आउटलुक अॅग्रीकल्चर, ११ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0