AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर!
शेती करताना शेतकर्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील एक समस्या म्हणजे ट्रॅक्टरची. सध्या डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरमध्ये डिझेलच्या किंमतीमुळे शेतकरी खूप नाराज आहेत. कारण शेतीमध्ये काम करत असताना, ट्रॅक्टरमध्ये जास्त डिझेल जळते यामुळे शेतकर्‍यांचा खर्च जास्त वाढतो आणि बचतही कमी होते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ट्रॅक्टरविषयी सांगणार आहोत, ज्याला तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता व डिझेलशिवाय ही हा ट्रॅक्टर चालवू शकता. हो, हा आहे ई-ट्रॅक्टर. लवकरच देशातील शेतकऱ्यांना ई-ट्रॅक्टर मिळण्यास सुरू होणार आहे. देशात या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत सुमारे ५ लाख रू. असण्याची शक्यता आहे. ई-ट्रॅक्टरचा परिचालन खर्च 1 तासात सुमारे 25 ते 30 रुपयांवर येईल. जे की डिझेल ट्रॅक्टरचा खर्च 1 तासासाठी लगभग 150 रुपये आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सुमारे 120 रुपयांची बचत होईल. ट्रॅक्टर जंक्शनच्या मते, हैदराबाद स्थित स्टार्ट-अप सेलेस्टियल ई-मोबिलिटीने एक इलेक्ट्रिक पावर्ड ट्रॅक्टरचे अनावरण केले आहे. ट्रॅक्टरमध्ये बॅटरी स्वॅपिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग इ. वैशिष्ट्ये आहेत. ई-ट्रॅक्टर शून्य उत्सर्जनानुसार तयार केले आहेत. जे पर्यावरणास अनुकूल आहे. संदर्भ – कृषी जागरण, 14 मार्च 2020 ही महत्वपूर्ण बातमी लाइक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
1445
8