कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
सध्या देशातील साखर उत्पादन २४६ लाख टन
नवी दिल्ली: फेब्रुवारी महिना अखेर देशातील साखर उत्पादन जवळपास २४६ लाख टन झाले आहे. साखर हंगाम अखेर पर्यंत ते ३१५ लाख टनापर्यंत होण्याची शक्यता असल्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राने ९१ लाख टन साखरेचे उत्पादन करून आघाडी घेतली असून हंगाम अखेर ९७ ते १०० लाख टन साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशाचे साखर उत्पादन ७३ लाख टन झाले असून हंगाम अखेर ते ११५ लाख टन होण्याचा अंदाज आहे.
कर्नाटकातील ४५ कारखान्यांनी फेब्रुवारी ४२ लाख टनचे नवे साखर उत्पादन केले आहे. त्यानंतर गुजरात (९ लाख टन), बिहार (५.७० लाख टन), पंजाब (४.५० लाख टन) व हरियाणा (४.३० लाख टन) अशी क्रमवारी दिसत आहे. तामिळनाडूत मात्र गेल्या पाच वर्षातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे फक्त ४.३० लाख टन इतकेच नवे साखर उत्पादन फेब्रुवारी अखेर झाले. संदर्भ – कृषी जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0
संबंधित लेख