AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्तापुढारी
देशात बासमती तांदळाची निर्यात निम्म्यावर
पुणे – देशातून मोठया प्रमाणात इराणला बासमती तांदूळ हे निर्यात होते. मात्र आता मागील दोन महिन्यांपासून बासमती तांदळाची होणारी ही निर्यात निम्म्यावर आली असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये तांदळाच्या भावात किलोमागे २० ते २२ रू. घट झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी ६० टक्क्यांहून अधिक तांदूळ हा एकटया इराणमध्ये जातो. देशातील पंजाब, हरियाणा, अमृतसर, दिल्ली आदि भागात बासमती तांदळाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथून पारंपारिक बासमतीसह ११२१, १४०१, १५०९ आदि तांदूळ परदेशात पाठविण्यात येतो. काही महिन्यांपासून अमेरिका व इराणमध्ये व्यापारयुध्द सुरू आहे,
या पार्श्वभूमीवर भारताने इराणकडून आयात केले जाणारे क्रूड ऑईल थांबविले आहे. त्यामुळे इराणनेही भारताकडून सर्वाधिक पाठविला जाणाऱ्या बासमती तांदळाची खरेदी करणे बंद केले आहे. संदर्भ – पुढारी, २६ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
100
0