AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
देशात ‘या’ ठिकाणी होणार डिजिटल शेती
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी उत्‍पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती यावरील सेंटर ऑफ एक्‍सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍प नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेस सादर केला होता. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत या प्रकल्‍पास मान्यता दिल्याची राष्ट्रीय संचालक डॉ. राकेशचन्द्र अग्रवाल यांनी नुकतेच विद्यापीठास पत्राव्दारे कळविले आहे, अशा प्रकारचा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा प्रकल्‍प देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्‍प ठरणार असुन विद्यापीठात आदर्श असे प्रगत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (CAAST- Center for Advanced Agricultural Science & Technology) स्‍थापन करण्‍यात येणार आहे.
हा प्रशिक्षण प्रकल्प सन २०१९ ते २०२२ या तीन वर्ष कालावधी करीता संकल्पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा हा भारत सरकारकडून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. यात यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व स्वयंचलीतसारखी डिजीटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डि‍जिटल शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्‍न करणार आहेत. संदर्भ – कृषी जागरण, २४ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
48
0