कृषी वार्ताकृषी जागरण
जागतिक कापूस उत्पादन २७६ लाख टन होण्याचा अंदाज
मुंबई: २०१९-२० च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात सहा टक्क्यांनी वाढ होऊन २७६ लाख टन होईल असा अंदाज ‘आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती’ने वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये जागतिक कापूस उत्पादन, वापर आणि दराविषयी सांगितले आहे. जागतिक कापूस उत्पादकतेत वाढ झाल्याने येणाऱ्या २०१९-२० च्या हंगामात कापूस उत्पादन २७६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कापूस वापर २७३ लाख टन राहणार आहे. या तुलनेत मागील वर्षी २०१८-१९ च्या हंगामात २६० लाख टन उत्पादन झाले होते आणि जागतिक कापूस वापर २६८.७ लाख टन झाला होता.
आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या नुसार ‘‘व्यापारातील अनिश्‍चितता, संथ आर्थिक वाढ आणि कमी मागणी यांसारखे सतत अडथळे असून ही कापूस वापर आतापर्यंत विक्रमी राहण्याची शक्यता आहे.’’ संदर्भ – अॅग्रोवन, ३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
26
0
संबंधित लेख