कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कापूस पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता!
भारतीय कापूस संघटना (सीएआय) याच्या मते, कापूस उत्पादनाची चालू हंगामात घट होऊन 335 लाख गाठ (एक गाठ - १७० किलो) होण्याचा अंदाज आहे. जे मागील अंदाजानुसार ५.२५ लाख गाठ कमी आणि मागील वर्षीच्या तुलनेत ३० लाख गाठी कमी आहेत. खरीप हंगामात कमी मान्सून पावसाच्या अभावामुळे प्रमुख उत्पादक असलेले महराष्ट्र व गुजरात या राज्यात कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. सीएआई अध्यक्ष अतुल एस. गणात्रा यांच्या मते, ३१ डिसेंबरपर्यत उत्पादक असलेल्या बाजारपेठेत कापसाची ११५.९७ लाख गाठी आल्या आहेत जे मागील वर्षी १४२.५० लाख गाठी उपलब्ध होत्या.
निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता सीआईएच्या मते, ३१ डिसेंबरपर्यत १७ लाख गाठ कापूस निर्यात होण्याचा ठराव झाला आहे. केवळ ५१ लाख गाठी निर्यात होण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात कापसाचा आयात २७ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे जे की मागील वर्षी १५ लाख गाठी ही आयात झाल्या आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात उत्पादन कमी सीआईएच्या मते, चालू पिकाच्या हंगामात २०१८-१९ मध्ये गुजरातमध्ये कापूसचे उत्पादन ८३.५० लाख गाठी होण्याचा अनुमान आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात १०५ लाख गाठी उत्पादन झाल्या होत्या. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत ८३ लाख गाठीत घट होऊन ७७ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या उत्तर भारताच्या काही राज्यात कापसाचे उत्पादन चालू हंगामात वाढवून ६० लाख गाठी होण्याचा अनुमान आहे जे मागील तुलनेत या राज्यात ५६ लाख गाठीचे उत्पादन झाले होते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ०७ जानेवारी २०१९
2
0
संबंधित लेख