आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण
या माशीचे पिल्ले व प्रौढ दोघेही पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहून रसशोषण करतात. या कारणामुळे पानांवर पिवळ्या रंगाचे डाग दिसतात व पानांचे आकार अनियमित होतात. यांच्या नियंत्रणासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपॅथ्रीन १५% ईसी @ १० मिली किंवा असीटामाप्रिड २० एसपी @ १० ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन ५० डब्ल्यूपी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
634
1
संबंधित लेख