गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी मका पिकातील खोड कीड व लष्करी अळीचे नियंत्रण
उन्हाळी मका हा सर्वात जास्त क्षेत्रामध्ये केला जातो. या पिकावर खोड कीड व लष्करी अळी हल्ला करून पिकांचे नुकसान करतात. त्याचबरोबर नवीन पानांवर समांतर छिद्रे करून ही पानांचे नुकसान करतात.
व्यवस्थापन –_x000D_ • पेरणी आधी निंबोळी पेंड १०० किलो प्रति एकर मातीमधे मिसळून द्यावी._x000D_ • शेतीमध्ये एक प्रकाश सापळा स्थापित करा._x000D_ • पीक फेरपालट पद्धतीचा वापर करा._x000D_ • किडींची अंडी गोळा करून व्यवस्थितपणे नष्ट करून टाकावेत._x000D_ • खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरॉन ३ जी @ ८-१० किलो प्रति हेक्टरी २०-२५ दिवस पेरणी अगोदर द्यावे._x000D_ • जर लष्करी अळीचा जास्त प्रादुर्भाव असेल, तर क्लोरोपायरीफॉस २० इसी २० मिली किंवा स्पिनोसड ४५ एस सी @३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी @४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी ३ @ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. प्रत्येक फवारणी वेळी कीटकनाशक बदलावे._x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
188
0
संबंधित लेख