AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Dec 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
२०१९ मध्ये ‘या’ भाज्यांवर ग्राहकांना जास्त पैसा लागला
काही दिवसातच नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. मात्र सरत्या वर्षाला ग्राहक कधीही विसरणार नाही. कारण या वर्षात अन्नधान्य, भाज्या व फळे या महत्वपूर्ण वस्तूंवर ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागला. त्यामुळे २०१९ हे वर्ष ग्राहकांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे. पण नवीन वर्षात भाज्यांचे किंमतीमध्ये कमी होतील ही आशा ग्राहकांना आहे.
या भाज्यांमध्ये कांदयाने ग्राहकांना चांगलेच रडविले आहे. याची किंमत रातोरात वाढत गेली. ही किंमत कधी २०० रू. पर्यंत पोहचली कळालीच नाही. यामुळे कांदा स्वयंपाक घरातून गायब होण्यास सुरूवात झाली. कांदयानंतर टोमॅटो, बटाटा यांच्या ही किंमती वाढत गेल्या. टोमॅटो ८० रू. किलो झाला. एवढेच नाही, तर लसूण व आलेच्या किंमतीदेखील २०० ते ३०० रू.च्या वर पोहोचल्या. त्यामुळे या रोजच्या खाण्यापिण्यातील भाज्यांवर जास्त खर्च ग्राहकांना करावा लागल्याने २०१९ हे वर्ष ग्राहक कधीच विसरणार नाही. संदर्भ – कृषी जागरण, २८ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
84
0