AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Oct 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकाच्या रोपांची पुर्नलागवडीपूर्वी काळजी घेणे आवश्यक
वांगी पिकाची लागवड साधारणपणे वर्षभर केली जाते. प्रामुख्याने या पिकामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, शेंडा आणि फळ पोखरणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. लहान पानांचा विषाणूजन्य रोग देखील दिसतो. ज्यामध्ये वांगी पिकामध्ये फुल आणि फळधारणा होत नाही. त्यामुळे पुर्नलागवडीच्या वेळी, सुरुवातीच्या टप्प्यात निरोगी पीक आणि जास्त उत्पादन मिळण्यासाठी खालील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
• अंडाकार वांगी फळाच्या तुलनेत गोल फळे असणाऱ्या वाणांमध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे अंडाकार फळाच्या वाणांची निवड करणे आवश्यक आहे. • सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पुर्नलागवड केल्यास, पिकावर कमी प्रादुर्भाव होतो. • नवीन पीक लागवडीपूर्वी पिकाचे अवशेष काढून नष्ट करा. पिकाचे अवशेष बांधावर ठेवू नका. आवश्यक असल्यास ते प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एक फेरोमोन सापळा त्या साठवणुकीत ठेवा. • लागवडीसाठी शेड हाऊस किंवा नर्सरीमध्ये तयार केलेली निरोगी रोपे निवडावी. • रोपे लागवडीपूर्वी २-३ दिवस आधी जमिनीमध्ये कार्बोफ्युरॉन ३ जी @3 किलो प्रति एकर जमिनीत मिसळून द्यावे. • दोन ओळीतील आणि दोन रोपांची अंतर योग्य ठेवावे. • लागवडीपूर्वी शिफारशीनुसार खतांची योग्य मात्रा द्यावी. • अळीमुळे खराब झालेले कोंब गोळा करून नष्ट करा किंवा पुढील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ते मातीमध्ये गाडावे. • शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या पतंगाचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी वोटा सापळे बसवावे. • शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीवर ट्रेचेला ही परजीवी ५५% पेक्षा जास्त आढळून आल्यास निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी. • शेंडा आणि पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास २०% गोमूत्र व कडूलिंबाची पाने, सीताफळ किंवा घाणेरीची पाने यांचा १०% अर्क यांची फवारणी करावी. • लिटल लीफ व्हायरस हा रोग झालेली झाडे काढून नष्ट करावीत. • प्रादुर्भाव वाढत असल्यास क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @ १० मि.ली. किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
206
10