AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 19, 01:00 PM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटामधील स्कॅब रोग
बटाटा या पिकाच्या सुरूवातीच्या टप्प्यावर स्कॅब या रोगाची लक्षणे दिसत नाही, मात्र सुरुवातीच्या टप्प्यात संक्रमण झालेल्या रोगाचा फिक्कट तपकिरी ते गडद व्रण कंदावर दिसून येतो. संक्रमित झालेली कंदाची साल ही गडद काळी खडबडीत होते. म्हणून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे गुणवत्ता व बाजारभाव कमी मिळतो.
स्कॅब प्रादुर्भावावर नियंत्रण – १. लागवडीसाठी रोगमुक्त कंदाची निवड करा. २. जर दर वर्षी शेतात समान समस्या उद्भवली, तर पुढील हंगामासाठी हिरवळी खतांचा वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी होईल. ३. क्षारपड जमिनीमध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट खताची मात्र देऊ नये. ४. बटाटा लागवडीच्या वेळी २० किलो बोरिक अॅसिडचा वापर करावा. अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
349
53