मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पावसात उघडीप राहील
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल, तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब राहण्यामुळे पावसाच्या प्रमाणात घट होईल. हीच स्थिती १७ सप्टेंबरपर्यंत राहील. मात्र या काळात वाढीव हवेचे दाब उत्तरेकडील बाजूस सरकतील व राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. या दरम्यान पावसात उघडीप झालेली असेल. १७ ते २१ सप्टेंबर या काळात राज्यातील मध्य व उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता राहील. मात्र पावसाचे प्रमाण साधारणच राहील. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
78
0
संबंधित लेख