AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तापुढारी
भारताकडून साखर आयातीला प्राधान्य द्या!
हंगामपूर्व विक्रमी शिल्लक साठयामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय साखर कारखानदारीला बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. तथापि, आता भारतातील साखर साठा कमी करण्यासाठी खुद्द आंतरराराष्ट्रीय साखर संघटनेने शेजारील देशांना भारतातून साखर आयातीचे आवाहन केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील साखऱेच्या किंमती स्थिर होण्यास मदत होईल, असे आंतरराष्ट्रीय संघटनेचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय साखर परिसंवादात आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक जोस औराईव्ह यांनी “भारतातील शिल्लक साखर साठयाविषयी चिंता व्यक्त करताना भारताशेजारील साखर आयात करणाऱ्या इराण, बांगला देश, म्यानमार, इंडोनिशिया या देशांनी भारतातून साखर आयात करावी,” असे आवाहन केले. ते म्हणाले, “भारतामध्ये साखर मोठया प्रमाणात वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले आहेत. जर या देशाने हा साखर साठा कमी करण्यास मदत केली तर जागतिक बाजारातील साखरेचे भाव स्थिर होण्यास मदत होऊ शकते.” संदर्भ – पुढारी, १० फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
21
0