AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Nov 19, 01:00 PM
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
चीन भारतातून मेहंदी, चहा, मिरची आयात करू इच्छित आहे
नवी दिल्ली, चीनमध्ये भारतीय मेहंदी पावडर, मिरची, चहा आणि शेवगा पावडरची मागणी वाढत आहे. ही उत्पादने भारतातून आयात करण्यासाठी चीन चर्चेत आहे. अलीकडेच शांघाय येथे झालेल्या इम्पोर्ट-ओनली फेअरमध्ये चिनी आयातदारांनी या मूल्यवर्धित उत्पादनांबद्दल बरीच माहिती घेतली.
५-१० नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू स्थित हिना निर्यातदारांना शांघाय येथे आयोजित केलेल्या चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोमध्ये मेहंदी पावडरच्या निर्यातीसाठी ३ कोटींपेक्षा जास्त रकमेची ऑर्डर मिळाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कृषी उत्पादनांविषयी बरीच चौकशी केली गेली. या उत्पादनांसाठी काही लाख डॉलर्सची ऑर्डर देखील देण्यात आली. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताने याप्रकारच्या उत्पादनांची २०० कोटी डॉलर्सची निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत चीनला भारताची निर्यात ८.५ अरब डॉलर्स आणि आयात ३६.३ अरब डॉलर्स इतकी आहे. संदर्भ:- इकॉनॉमिक टाइम्स, १८ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
50
1