AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तापुढारी
भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प
चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारताकडून चीनला होणारी व चीनमधून इतर देशांना होणारी मिरचीची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, बांग्लादेश, फिलिपिन्स, थायलंड हे देश मिरचीसाठी भारताकडे वळले आहेत. यंदा झालेल्या अवेळी पावसाचा फटका उत्पादनाला बसला असून त्यात अन्य देशांतूनही मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये मिरचीच्या भावात पुन्हा एकदा तेजी निर्माण झाली आहे.
आंध्र प्रदेश व तेलंगणा मिळून लाल मिरचीचे अडीच कोटी पोती उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकमध्ये ६० ते ६५ लाख पोती व मध्य प्रदेशातून ८ ते १० लाख पोत्यांचे उत्पादन होईल. या पध्दतीने देशभरात सव्वातीन ते साडेतीन कोटी जवळपास मिरची उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, शीतगृहात मागील वर्षीची शिल्लक नगण्य असून नव्याने आलेला माल मोठया प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता कमी आहे. या वर्षी लाल मिरचीचे उत्पादन १५ टक्के वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. देशाच्या उत्पादनाच्या ४५ टक्के एवढे प्रचंड पीक एकटया आंध्र प्रदेशमध्ये होते. संदर्भ – पुढारी, १२ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
34
0