मान्सून समाचारअॅग्रोवन
विदर्भ, मराठवाडयात पावसाची शक्यता
पुणे: राज्यात पाऊस थांबल्याने अनेक भागातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडयात आज पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयात जोराच्या सरी येण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाच्या उघडपीमुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान 30 अंशांच्या पुढे गेले आहे. 20 ऑगस्टपर्यंत सकाळच्या काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी सर्वाधिक 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. कोकणात 30 ते 33 अंश, मराठवाडयात 29 ते 34 अंश व विदर्भात 29 ते 34 अंशांच्या आसपास आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 21 ऑगस्ट 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
0
संबंधित लेख