AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Aug 19, 06:00 PM
मान्सून समाचारसकाळ
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे: बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज (१४ ऑगस्ट) विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांतील पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मराठवाडयात ढगाळ वातावरण असले तरीही पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. संदर्भ – सकाळ, १४ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
56
0