मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात चांगल्या पावसाची शक्यता
महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यातही उत्तर व पूर्व भागावर हवेचे दाब कमी राहतील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील, त्यानुसार कोकणात पावसाचा जोर अधिक राहिल. त्याचबरोबर पुर्वेकडे सरकण्यास व उत्तर दिशेने वाहण्यास हवामान घटक अनुकूल आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढेल. हीच स्थिती २८ ते २९ जुलैला राहील. मात्र पुन्हा ३० ते ३१ जुलैला पावसाचे प्रमाण कमी राहील. २ ऑगस्टला हवेचे दाब कमी होत असून पुन्हा पावसाचा जोर वाढेल. २८ जुलैला विदर्भ, मराठवाडयासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील तर दक्षिण महाराष्ट्रात तो कमी असेल. हीच स्थिती २ व ३ ऑगस्टला राहील. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल, तर दक्षिण महाराष्ट्राच्या भागात ते कमी राहील. कोकणात या आठवडयात पावसाचे प्रमाण अधिक राहील. रत्नागिरी व रायगड जिल्हयात अतिवृष्टीची शक्यता राहील. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहील. २९ जुलै, २ ते ४ ऑगस्ट या काळात मुंबईतही पाऊस अधिक होईल. कृषी सल्ला: १. ज्या ठिकाणी ६५ मिली मि जमिनीत ओलावा असेल, तिथे घेवडा, धने, सुर्यफुल, तूर, राळा, तीळ, मका या पिकांच्या पेरण्या कराव्यात. २. जनावरांना हिरवा चारा मिळावा म्हणून अफ्रिकन टॉल मका पेरणी करावी. ३. गुणवंत व डी.एच.न ६ गवताची लागवड करा व अधिक चारा मिळवा. ४. कोरडवाहू भागात रब्बी ज्वारी पेरणी पूर्वी सारे पाडा व पावसाचे पाणी त्यात मुरवा. ५. भात खाचरात पाणी साठवा ६. चांगला पाऊस झाल्यास तूरीची पेरणी फायदयाची संदर्भ – जेष्ठ हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
101
0
संबंधित लेख