AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
तांदळामध्ये किमान समर्थन मुल्यात वाढ करण्याची मागणी
शासनाने खरीप विक्री हंगाम २०१९-२० साठी तांदळाचे किमान समर्थन मुल्य (एमएसपी) मध्ये ३.३ – ३.४ टक्क्यांची वाढ करण्याची मागणी केली आहे, जे की मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर ३.०५ टक्के झाला होता.
कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, खरीप हंगामातील प्रमुख पीक तांदळाच्या एमएसपीमध्ये ६० रू. प्रति क्विंटलची मागणी कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (सीएसपी) ने केली आहे. खरीप विक्री हंगाम २०१९-२० साठी सामान्य वाण तांदळाचे एमएसपी १,८१० रू. आणि ए-श्रेणी तांदळाचे एमएसपी १,८३० रू. प्रति क्विंटल करण्याची मागणी केली आहे. सामान्यपणे सीएसपीच्या मागणींवर अंतिम निर्णय घेतला जातो. खरीपातील ज्वारी, बाजरी आणि मक्का या पिकांचे एमएसपीमध्ये सीएसीपीने ६ ते ७ टक्क्यांची वाढ करण्याची मागणी केली आहे. खादय तेलच्या आयातमध्ये घट झाल्याने चालू खरीप हंगामात सीएसीपी यांनी तेलवर्गीय असलेली प्रमुख पिके सोयाबीन आणि भुईमूगचे एमएसपीमध्ये ८ ते १० टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0