AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
केंद्र सरकार एक लाख टन कांदयाचा बफर स्टॉक करणार
नवी दिल्ली. केंद्र सरकारने कांदयाबाबत मोठी घोषणा केली आहे. शासन २०२० मध्ये कांदयाचा १ लाख टन कांदयाचा बफर स्टॉक करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. शासनाने चालू वर्षासाठी ५६ हजार टनचा बफर स्टॉक जमा केला होता. मात्र हा कांदादेखील कमी पडला आणि किंमती गगनाला भिडल्या. सध्या देशातील अनेक भागात कांदयाचे दर प्रति किलो १०० रुपयांच्या वर आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सांगण्यात आले की, पुढील वर्षी सुमारे १ लाख टन कांदयाचा बफर स्टॉक तयार करण्याचा निर्णय झाला. सहकारी संस्था नाफेड रब्बी हंगामात खरेदी करेल. खरीप हंगामातील कांदयाच्या तुलनेत हा कांदा लवकर खराब होत नाही. यावर्षी कांदयाचे उत्पादन २६ टक्क्यांनी घटले आहे. यावर्षी खरीप हंगामात पेरणी झालेल्या कांदयाचे उत्पादन हे यंदाच्या अवकाळी पावसामुळे कांदयाचे पीक खराब झाले आहे. संदर्भ - इकोनॉमिक टाइम्स, ३० डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
378
0