कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्र शासनाने तांदूळ निर्यातचे नियम केले अनिवार्य
नवी दिल्ली – केंद्र शासनाने युरोपियन युनियनच्या देशांना तांदूळ निर्यातचे नियम अनिवार्य केले आहे. या देशांना तांदूळ निर्यात करण्यासाठी आता निर्यातकांना निर्यात निरीक्षण एजन्सी किंवा निर्यात निरीक्षण परिषदकडून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. याचा परिणाम थेट तांदळाच्या निर्यातीव होणार असल्याची शक्यता आहे. विदेश व्यापार महानिदेशालय (डीजीएफटी) च्या अधिसुचनेनुसार, युरोपियन युनियन देशांना बासमतीसोबतच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी निर्यातकांना निर्यात निरीक्षण एजंन्सी किंवा निरीक्षण परिषदकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे. तांदळामधील कीडनाशकामुळे शासनाने निरीक्षण प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
या निर्णयाने बासमतीसोबतच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. युरोपियन युनियनच्या देशांची बासमती तांदळाची एकूण निर्यात जवळपास तीन लाख टन होती. ईरानला बासमती तांदळाची निर्यात होत नाही, जे की सौदी अरबमध्ये सीमित मात्रामध्येच निर्यात होत आहे. यंदा वित्त वर्ष पहिल्या सहामाही एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये ११.३३ टक्के घट झाली व एकूण निर्यात १८.७० लाख टन झाली आहे. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, ५ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
351
0
संबंधित लेख