AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Oct 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत ८५ रूपयांची वाढ
नवी दिल्ली: केंद्र शासनाने रबी हंगाम २०२०-२१ साठी पिकांचे किमान आधारभूत मुल्यमध्ये ४.६१ टक्क्यांवरून ७.२६ टक्क्यांची वाढ केली आहे. यामध्ये गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत ८५ रूपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. या वाढीनंतर गव्हाची किमान आधारभूत किंमत आता १,९२५ रूपये प्रतिक्विंटल झाली आहे. डाळींच्या किमान आधारभूत किंमतीतही ३२५ रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
जवसाच्या किमान आधारभूत किंमतीतही ८५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील हंगामात १,४४० रूपये असलेल्या जवसाचे दर या हंगामात १,५२५ रूपये होतील. डाळवर्गीय पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मसूर डाळीची किमान आधारभूत किंमत ३२५ रूपयांनी वाढवून ४,४७५ रूपयांवरून ४,८०० रूपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. हरभरा डाळीची किमान आधारभूत किंमत २५५ रूपयांनी वाढून ४,८७५ रूपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. मागील वर्षी ती ४,६२० रूपये प्रतिक्विंटल होती. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २३ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
587
0