कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्र सरकार चार लाख टन मक्का आयातला मंजूरी देण्याची शक्यता
केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठेतील वाढत्या मक्याच्या किंमतीला आळा घालण्यासाठी ४ लाख टन मक्का आयातला मंजूरी देण्याची शक्यता आहे. पोल्ट्री फीड निर्मातांच्या सहयोगाने स्टार्च मिल्सची मागणी लक्षात घेऊन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक बाजारपेठेत मक्याच्या किंमतीत महिन्यातच जवळपास १८ ते २० टक्क्यात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये मक्याच्या भावात वाढ होऊन २,२०० ते २,२५० रुपये प्रति क्विंटल झाला आहे, तर महिन्यातच भाव ४०० ते ४५० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढला आहे. मध्य प्रदेशातील बाजारपेठेत मक्याचे भाव २,००० ते २,०५० रुपये प्रति क्विंटल आहे. रब्बी हंगामात मक्काची आवक एप्रिलमध्ये सुरू होईल. रब्बी हंगामात सर्वात जास्त मक्का उत्पादन बिहारमध्ये होत आहे, तर इतर उत्पादक राज्य तमिलनाडु, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश आहेत. कृषी मंत्रालयाने पहिल्या अंदाजमध्ये खरीफ हंगाम २०१८-१९ मध्ये २१४,७ लाख टन मक्का उत्पादनांचे अंदाज सांगण्यात आला
होता, जे मागील वर्षीच्या खरीप हंगामाचे उत्पादन २०२.४ लाख टनपेक्षा जास्त आहे. खरीफमध्ये मक्काचे उत्पादन मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात होते. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ०८ फेब्रुवारी २०१९
5
0
संबंधित लेख