AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Mar 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
सीसीआय एप्रिलपासून घरेलू बाजारात विकणार कापूस
कापसाच्या वाढत्या किंमती पाहून, कापूस कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने एप्रिलपासून घरगुती बाजारपेठेत कापूस विकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर २०१८ पासून चालू पीक हंगामात १०.६० लाख गाठ (एक गाठ - १७० किलो) कापसाची खरेदी केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद बाजारपेठेत शंकर - ६ असलेल्या वाणच्या कापसाचा भाव वाढून ४४,००० ते ४४,५०० रुपये प्रति किलो (एक किलो -356 किलो) झाला आहे.
सीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारीच्या मते, “चालू हंगामात एमएसपीची १०.६० लाख गाठ कापसाची खरेदी केली आहे. आठवड्यातभरात कापसाच्या किंमतीत जवळजवळ २,००० रुपये प्रति किलो इतका वेग आला आहे.” नार्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष राकेश राठी यांनी सांगितले, “चालू हंगाममध्ये कापूस उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे घरेलू बाजारात कापसाच्या किंमती वाढल्या आहेत.” संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0