AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jan 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
या खाद्यान्नच्या किमान पाठिंबा मूल्यात वाढ
नवी दिल्ली: केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने सुक्या खोबऱ्याच्या किमान पाठिंबा मूल्यात वाजवी सरासरी दर्जा निरंतर रहावा यासाठी मंजुरी दिली आहे. या सुक्या खोबऱ्याचे किमान पाठिंबा मूल्य यावर्षी (२०१९) ला प्रति क्विंटल ९,९२० रू. वाढविले आहे, तर हे मूल्य मागील वर्षी (२०१८) प्रति क्विंटल ७,७५० रू. होता, त्यामुळे हा निर्णय कृषी क्षेत्रासाठी नवीन वर्षाची भेटच म्हणावी लागेल. या निर्णयामुळे, सूक्या खोबऱ्यासाठी ठरवलेल्या किमान पाठिंबा मूल्यामुळे शेतकऱ्यांना रास्त किमान मूल्य मिळण्याचे आश्वासन व देशातील नारळ उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी गुंतवणूक निश्चित करणे अपेक्षित आहे.
कृषी मूल्‍य आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशींच्या आधारे ही मंजूरी देण्यात आली असून सीपीएसपीचे तज्ज्ञ यांनी उत्पादन मूल्य, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खाद्य तेलांच्या किंमतींचा कल,एकंदरीत मागणी,पुरवठा व खोबऱ्याचे तेल बनविण्याच्या प्रक्रियेवरील मूल्य आणि शिफारस केलेल्या किमान पाठिंबा मूल्यांचा ग्राहकांवर होणारा परिणाम या सर्व बाबी शिफारशी करताना लक्षात घेऊन हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. संदर्भ - कृषी जागरण, २ जानेवारी २०१९
5
0