AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Aug 19, 01:00 PM
कृषि वार्तालोकमत
साखर निर्यातीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत
नवी दिल्ली: केंद्र सरकारने बुधवारी महत्वाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार कारखान्यांना देशाबाहेर साखर निर्यात करण्यासाठी अनुदान दिले जाईल व अनुदानाची ही रक्कम ऊसाची थकीत बिले भागविण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने घेतलेल्या या निर्णयानुसार २०१९-२० या गळित हंगामासाठी कारखान्यांना ६० लाख टनापर्यंतच्या साखर निर्यातीवर टनामागे १०,४४८ रूपयांचे एक रकमी अनुदान दिले. शेतकऱ्याला देय असलेल्या ऊसाच्या रक्कमेपोटी, साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. यातून काही शिल्लक राहत असल्यास ती रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा होईल. संदर्भ – लोकमत, २९ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0