कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्रशासनाने १.२ लाख टान कांदा आयातीला दिली मंजूरी
नवी दिल्ली. केंद्र शासनाने कांदयाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कांदा आयात करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या १.२ लाख टन कांदा आयात करण्याच्या या निर्णयाला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली.
कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, कांदयाचे मुख्य उत्पादक असलेल्या राज्यांमध्ये अवकालीन झालेल्या पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादक बाजारपेठेमध्ये आवाक वाढत नाही. केंद्रीय उपभोक्ता प्रकरण, खाद्य व सार्वजनिक वितरण, राम विलास पासवान यांनी याच महिन्यात देशामध्ये कांदयाची उपलब्धता वाढून किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने एक लाख टन कांदा आयात करण्याची घोषणा केली होती. विदेश व्यापार करणारी केंद्रीय शासनाची कंपनी एमएमटीसी ४ हजार टन कांदा आयात करण्यासाठीचा टेंडर ही जाहीर केला आहे. संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २० नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
104
0
संबंधित लेख