AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Jul 19, 02:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
आर्थिक संकल्प २०१९- दहा हजार शेतकरी उत्‍पादक संघ बनविणार
नवी दिल्‍ली : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज संसदेत २०१९ चे आर्थिक संकल्प सादर केले. यावेळी अनेक विभागांसोबतच कृषी विभागासाठीही अनेक तरतुदी सांगितल्‍या. यामध्ये सितारामन यांनी सांगितले की, पुढील ५ वर्षात १० हजार नवीन शेतकरी उत्पादक संघ बनविणार, डाळीच्या बाबतीत देश आत्मनिर्भर बनेल, आयातीवर कमी खर्च करणे हे लक्ष्य आहे. यासोबतच डेयरीच्या कामांनादेखील प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदाता आता ऊर्जादातादेखील होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य भाव मिळावे हे ध्येय आहे. त्यासोबतच शुन्य बजेटवर शेती करण्यावर जोर दिला जाईल.
शेतकर्‍यांचे जीवन आणि त्‍यांचे व्यवसाय सोपे आणि सुटसुटीत व्हावेत यासाठी काम केले जाणार आहे. सरकार शेतीमध्ये अनेक योजनांव्दारे गुंतवणूक करणार आहे. तसेच देशातील शेतकर्‍यांचे उत्‍पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्‍न असणार आहे, असे सांगितले. २०२४ पर्यंत गावातील प्रत्‍येक घरात पाणी पोहोचविण्यात येणार आहे. हे काम जल जीवन मिशनच्या माध्यमातून केले जाणार आहे. ज्‍याव्दारे प्रत्‍येक घरात पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्‍न असणार असल्याचेदेखील यावेळी त्यांनी सांगितले. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ जूलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
60
0