AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Jun 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
एकात्मिक कीड व्यवस्थापन- • वांगी लागवडीसाठी रोग व किडी सहनशील असणाऱ्या वाणाची निवड करावी. • वांगी पिकातील फळ व शेंड पोखरणाऱ्या अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पाने कापावीत. • प्रति एकरी १०-१२ कामगंध सापळे स्थापित करावीत. • प्रादुर्भावच्या सुरूवातीच्या अवस्थेत जैविक कीटकनाशकचा वापर करावा. • गोमुत्र (२०%), निम, सीताफळ, घाणेरी, जट्रोपा(१०%) या अर्काची फवारणी घ्यावी. • जास्त प्रादुर्भाव झाल्यास क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५% एससी @४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झाएट ५ एसजी @४ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लूपी @१० ग्रॅम किंवा इमाडाक्लोप्रिड १९.८१ ईसी @४ मिली किंवा सायपरमेथ्रीन ३%+क्विनोलफोस २० इसी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
• प्रत्येक फवारणीच्या वेळेस कीटकनाशक बदलावे. • पिकांचे अवशेष शेतीच्या बांधावर टाकू नये. ते अवशेष व्यवस्थित नष्ट करावे. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
549
65