AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताअॅग्रोवन
ब्राझील करणार भारताकडून गहू खरेदी
नवी दिल्ली – दोन्हीं देशांच्या कृषीमंत्र्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ब्राझील भारताकडून गहू, भात व इतर भरडधान्य खरेदी करण्याती शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्रालयाने दिली.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व ब्राझीलच्या कृषीमंत्री टरेझा क्रिस्टीना कोरेओ डा कोस्टा डियाझ यांच्यामध्ये व्दिपक्षीय व्यापार संधींबाबत नुकतीच चर्चा झाली. चर्चेमध्ये ब्राझीलच्या कृषीमंत्र्यांनी भारताकडून भरडधान्य आयातीसाठी अनुकूलता दर्शविली. डियाज म्हणाल्या, “ब्राझील भारतातून गहू, भात, भरडधान्य, तूर आयात करण्यासंबंधी अनुकूल आहे. ब्राझीलचा शून्य टक्के आयातशुल्काने साडेसात लाख टन गहू आयातीचा कोटा आहे. याचा वापर भारत ब्राझीलला निर्यात करण्यासाठी करतो. ब्राझील दरवर्षी ७० लाख टन गहू आयात करतो.” ब्राझील हा जगात गहू, भात व इतर धान्य आयात करणारा महत्वाचा देश आहे. तर, भारत हा गहू व भात उत्पादनातील मोठा देश आहे. “२०१८ -१९ मध्ये भारताचा ब्राझीलसोबत व्दिपक्षीय व्यापार १०५ कोटी डॉलरचा होता. व्यापाराच्या संधी उपलब्ध असल्यांपैकी हा आकडा कमी असून भारत व दक्षिण अमेरिकन देशामधील असलेल्या व्यापाराल प्रोत्साहन देण्याची गरज आहे,” असे तोमर म्हणाले. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, १४ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
50
1