आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फुलकोबीतील ब्लाइंड नेस(वांझ रोप) विकृती लक्षणे आणि उपाय:
फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली या पिकांमध्ये ब्लाइंड नेस (वांझ रोप) हि विकृती आढळून येते यामध्ये अतिशय कमी तापमान असल्यामुळे रोपांचा शेंडा न वाढून पिकात गड्डा विकसीत होत नाही किंवा गड्डा तयार होण्याच्या अवस्थेत फुलकिडे सारखी कीड व इतर रोगाचा प्रादुर्भाव असल्यास आणि पिकात काळजीपूर्वक आंतर मशागत न केल्यास पिकास इजा होऊन विकसित होणार लहान गड्डा नष्ट होणे हि समस्या येते. यावर उपाय योजना म्हणून अतिशय कमी तापमानात ह्या पिकांची लागवड करणे टाळावे अथवा योग्य वातावरणात मानवणाऱ्या निरोगी रोपांची लागवडी साठी निवड करावी. फुलकिडे आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य ती फवारणी करावी व पिकात काळजीपूर्व आंतर मशागत करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0
संबंधित लेख