AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Apr 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कारले पिकामध्ये मंडप उभारणीचे फायदे
• कारले एक वेलवर्गीय पीक असून, वेलीला आधार दिल्यास त्याची वाढ चांगली होते. याउलट जमिनीवर असलेल्या कारल्याच्या वेलीला मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाही. झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही. फळेदेखील कमी लागतात. यामुळे मंडपवर वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिने चांगल्या राहतात. • मंडपच्या आधारामुळे फळे जमिनीपासून ५ ते ६ फुट उंचीवर वाढतात. त्यामुळे पाने, फळे यांचा जमिनीशी संपर्क नसल्यामुळे किडी व रोगांचे प्रमाण कमी राहते.
• मंडप पद्धतीमुळे कारले फळांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सातत्याने मिळाल्यामुळे फळांचा रंग चांगला राहतो. • खुरपणी, फवारणी, फळांची तोडणी ही कामे अत्यंत सोपी होतात. • मंडपावर कारल्याच्या वेली पोहचायला १.५ ते २ महिन्याचा कालावधी लागतो. त्या दरम्यान कारले पिकामध्ये पालेभाज्यांसारखे अंतरपीक घेता येते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
628
108