AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Apr 19, 06:00 PM
जैविक शेतीअॅग्रोवन
फळपिकांमध्ये आच्छादनाचा उपयोग
सेंद्रिय घटक पिकांना उपलब्ध व्हावे यासाठी फळ पिकांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी वाळलेले गवत, गव्हाचा भुसा, ऊसाचे पाचट व कपाशीचे काड याचे आच्छादन करावे. कारण नैसर्गिक घटक असलेल्या आच्छादनाचे कालांतराने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते.
फायदे : _x000D_ • जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची २० ते ३० टक्क्यांनी बचत होते._x000D_ • पीक उत्पादनात वाढ होऊन ८० ते ९० टक्के तण नियंत्रण होते. जमिनीत हवा खेळती राहते. पाऊस व वारा यांपासून होणारी जमिनीची धूप थांबते._x000D_ • जमिनीचे अंतर्गत तापमान संतुलित राहते. तापमान संतुलित राहिल्यामुळे जिवाणूची प्रक्रिया आणि जमिनीत जीवरासायनिक प्रक्रिया उत्तम प्रकारे चालण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते_x000D_ • पिकांचे उत्पन्न, उत्पादन व दर्जा सुधारते._x000D_ • खते आणि पाण्याचा योग्य वापर होतो._x000D_ संदर्भ – अॅग्रोवन _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
361
1