जैविक शेतीअॅग्रोवन
हिरवळी खतांचे फायदे
हिरवळी खतांचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी केला जातो. हिरवळीचे खते हे दोन मार्गांनी मिळविता येतात. जमिनीमध्ये हिरवळी खतांची पेरणी करून व जंगलामध्ये झाडांची हिरवी पाने तसेच झाडांच्या शाखा पानांसहित मातीमध्ये कुजवून खत तयार केले जाते. धेंचा, ताग, शेवरी या पिकांचा हिरवळी खत म्हणून वापर केला जातो.
हिरवळी खतांचे फायदे: • जमिनीमध्ये जैविक घटक व हयूमसचे प्रमाण वाढविते • नत्र प्रमाणात वाढ होते • मातीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते • मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविते • मातीमध्ये असलेले सेंद्रिय घटक पिकांना मुळाद्वारे पोहचविते • पुढच्या पिकांसाठी पोषकतत्व उपलब्ध करून देते. संदर्भ - TNAU अॅग्रीपोर्टल जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
410
1
संबंधित लेख