पशुपालनwww.vetextension.com
मान्सून हंगामात जनावरांचे संगोपन ‘असे’ करावे
मान्सून हंगामामध्ये पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. जर पावसाळी हंगामात सावधगिरीच्या उपाययोजना केल्या नाहीत, तर अनेक रोगांमुळे जनावरांचा मृत्यू होण्याची संभावना असते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. • ज्या गोठ्याचे छत पाण्याने गळत आहे ते दुरुस्त करा. • गोठ्यामध्ये खेळती हवा असावी. • जनावरांचे पोटातील जंतूंपासून संरक्षण करण्यासाठी औषधांचा पुरवठा करावा. • जनावरांच्या गोठ्यात मच्छर आणि डासांचे नियंत्रण करावे. • जनावरांचा चारा आणि खुराक कोरड्या जागेत साठवण करावी. • जनावरांच्या शरीराची तपासणी करावी. दूध काढुन झाल्यानंतर कास निर्जंतुकीकरण करावी. • वेळोवेळी जनावरांचा गोठा फिनेलने स्वच्छ करावा. • जनावरे स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी जनावरांना नियमित धुवून घ्यावे. • दोन जनावरांमध्ये योग्य अंतर असावे. • जनावरांच्या शरीरावरील कोणत्याही प्रकारच्या जखमांची विशेष काळजी घ्या आणि अँटीसेप्टिक वापरा. • जनावरांना अतिरिक्त हिरवा चारा खाण्यास देऊ नका. कारण त्यामुळे जनावरांना अतिसार होऊ शकतो. • जनावरांमध्ये चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी संतुलित आहार द्यावा. • जनावरांचे शेण आणि मूत्राचे योग्यरित्या विल्हेवाट लावावी, अन्यथा ते पसरल्यास रोगांची लागण होण्याची शक्यता असते. • संक्रमित (रोगग्रस्त) जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे. • जनावरामध्ये प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी इम्यूनोस्टिम्युलंट द्यावे. संदर्भ :- www.vetextension.com
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
418
0
संबंधित लेख