AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
आता, ट्रॅक्टर चालणार बॅटरीवर!
लहान व सीमांत शेतकऱ्यांना शेतीच्या लागवडीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी ट्रॅक्टरसाठी तर कधी डिझेलसाठी सध्या डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरमध्ये डिझेलच्या होणाऱ्या खर्चाने शेतकरी नाराज आहेत. कारण शेतीमध्ये काम करताना ट्रॅक्टरमध्ये अधिक डिझेल लागते, त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढतो आणि बचत कमी होते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ट्रॅक्टरविषयी सांगणार आहोत, ज्याला तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता आणि डिझेलशिवाय ट्रॅक्टर चालवू शकता. होय, भारतात एक नवीन ट्रॅक्टर आले आहे, जे डिझेलने नाही तर बॅटरीने चालते! हो, यामध्ये डिझेल टाकण्यासाठी टाकीच नाही. त्यामुळे डिझेलची गरजच भासणार नाही. हे ट्रॅक्टर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: छोट्या शेतकर्‍यांना हे खूप फायदेशीर ठरेल. या ट्रॅक्टरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरप्रमाणेच शक्तिशाली आहे आणि शेतीतील सर्व कामे करण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टर कंपनीचे नाव सुकून सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड असून या ट्रॅक्टरचे नाव सुकन आहे. हे एक मिनी ट्रॅक्टर आहे आणि त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे या ट्रॅक्टरने मुळीच प्रदूषण होत नाही. आपल्या सर्वांना माहितच आहे की, आपल्या देशात प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेल आणि पेट्रोल गाड्यांमधून बरेच प्रदूषण होत आहे, परंतु या बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण अजिबात पसरणार नाही. संदर्भ – कृषी जागरण, 6 मार्च 2020 ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा अन् आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
1774
96