कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बासमती तांदळाची निर्यात ६.२५ टक्क्यांनी वाढली
वित्त वर्ष २०१८-१९ च्या पहिले ११ महिने म्हणजेच एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान बासमती तांदळाची निर्यात ६.२५ टक्क्यांनी वाढून ३८.५५ लाख टन झाली आहे. एपीडाच्या एक वरिष्ठ अधिकारीनुसार, “बासमती तांदळाची निर्यात वित्त वर्ष २०१८-१९ च्या पहिले ११ महिने एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यानमध्ये वाढ होऊन ३८.५५ लाख टन झाली आहे, जे मागील वर्षी २०१७-१८ च्या समान कालावधीत ही निर्यात ३६.२८ लाख टन ही झाली होती.”
इरानबरोबरच इराक व अमेरिकाकडून आयातची मागणी वाढत असल्याने बासमती तांदळाची एकूण निर्यात वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये तीन ते सव्वा तीन लाख टन जास्त होण्याचा अंदाज आहे. इरानला पूसा १,१२१ व सेला या बासमती तांदळाची निर्यात ८२,००० ते ८४,००० रू. प्रति टनच्या दरने होत आहे. तथापि, या दरम्यान बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत १६.५५ टक्के घट आली असून एकूण निर्यात ६७.११ लाख टनपर्यंत पोहचली आहे. बांग्लादेशसोबतच आफ्रिकेतील देशांच्या आयातीमध्येदेखील मागणी कमी झाल्याने बिगर बासमती तांदळाची निर्यात कमी झाली आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १२ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख