AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Oct 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
इराण व सौदीकडून बासमती तांदळाच्या मागणीत घट
उत्पादक राज्य असलेल्या बाजारपेठेत बासमती भाताची नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे, परंतु इराण व सौदी अरेबियाकडून बासमती तांदळाच्या मागणीत घट झाली. याचा परिणाम बासमती भाताच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. एपेडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमध्ये भारतातील तांदूळ निर्यातकांचा पैसा अजूनही अडकला आहे, यामुळे भारतीय निर्यातक नवीन निर्यात करार करत नाहीत. तथापि, ऑक्टोबरमध्ये इराणची आयातची मागणी कमी झाली आहे.
ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष २०१९-२० एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान बासमती तांदळाच्या निर्यातमध्ये १०.२७ टक्क्यांनी घट झाली आहे. एकूण निर्यात १६.६ लाख टन ही झाला आहे. मागील आर्थिक वर्षात या समान कालावधीत १८.५ लाख टन निर्यात झाला होता. तथापि, बासमती तांदळाची घरेलू मागणी वाढत आहे. चालू हंगामात भात उत्पादनाचे प्रमाण जास्त होण्याचा अंदाज आहे. इराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा आयातकर्ता आहे. एपीडाच्या मते, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये इराणने भारताकडून १०,७९० करोड रू.चे १४.८३ लाख टन बासमती तांदूळ आयात केला होता. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये देशात बासमती तांदळाची एकूण निर्यात ४४.१४ लाख टनचे ३२,८०४ करोड रू. झाले होते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
78
0