AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
31 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषीमध्ये होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा उपयोग!
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) चा उपयोग कृषीमध्ये करत आहेत. हवामानाची माहिती, पिकांचे उत्पन्न याच्या आकलनासहित कित्येक कामात याचा उपयोग केला जाऊ शकतो. ज्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना यांचा फायदा होऊ शकतो. कृषी मंत्री सांगतात की, कृषी मंत्रालय, सहकारिता व शेतकरी कल्याण विभाग पंतप्रधान विमा योजना अंतर्गत विभिन्न एजन्सी व आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून पिकांच्या कापणीच्या पध्दतीचा अभ्यास सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) चा उपयोग कृषीचे कित्येक क्षेत्र हवामान, पीक व किंमतचे पुर्वअनुमानामध्ये केले जाऊ शकते. एआईचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी व किडींच्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व सल्ला या सेवा देण्यासाठीदेखील उपयोग होऊ शकतो. हे खत, रसायन, सिंचनसारख्या कृषी क्षेत्राला अशा प्रयोगामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होऊ शकते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २६ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0