पशुपालनNDDB
जनावरांच्या बाबतीत डिसेंबरमध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी
• थंडीपासून संरक्षणासाठी जनावरांसाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये थंडी लागणार नाही अशा ठिकाणी बांधावे. • लाळ्या खुरकत रोग, फऱ्या, देवीरोग, एन्टरोटोक्सिमिया इ. रोग रोगांच्या लसी दिल्या नसल्यास त्वरित लसीकरण करून घ्यावे. • जनावरांना खनिज मिश्रण (मिनरल मिक्चर) निर्धारित प्रमाणात मिसळून खाद्यामध्ये द्यावे.
• दुधारू जनावरांच्या स्तनदाह रोगापासून बचाव करण्यासाठी दूध काढल्यानंतर कास जंतुनाशकाच्या द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावी._x000D_ • जनावरांच्या चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रमाण योग्य राखून सुख्या (कोरडा) चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. कारण हिरव्या चाऱ्याच्या अति सेवनामुळे अतिसार होण्याची शक्यता असते._x000D_ • जनावरांचा जर हिरवा चारा शिल्लक असेल तर तो सावलीत वाळवा आणि कोरडे गवत म्हणून द्यावा._x000D_ _x000D_ संदर्भ: एनडीडीबी_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
247
0
संबंधित लेख