सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील नुकसानकारक 'पिसारी पतंगा'चे नियंत्रण!
• पिकाच्या कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये या किडीच्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. • अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्यांना, फुलांना व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. • पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात. • नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगांवर छिद्रे पाडतात व त्या छिद्रांमधून जेव्हा त्या बाहेर पडतात तेव्हा झालेल्या नुकसानीचा प्रकार आढळून येतो. • त्यानंतर पूर्ण वाढलेल्या अळ्या शेंगावर अथवा शेंगांवरील छिद्रांमध्ये कोशावस्थेत जातात. • तुरीच्या कळी व फुलगळीच्या अनेक समस्या दिसून येत असून त्यामागे नैसर्गिक कारणाशिवाय पाण्याचा ताण व या किडीचा प्रादुर्भाव • ही मुख्य दोन कारणे आहेत. पावसाळ्याच्या उत्तरार्धात या किडीचे प्रमाण भरमसाठ वाढते. सर्वेक्षण : पीक कळी अवस्थेत असताना शेतकन्यांनी हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण करावे कारण तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान पीक फुलो-यात असताना आणि शेंगा भरताना आढळून येते. रोज सर्वेक्षण केल्यानंतर कामगंध सापळ्यातील नर पतंगांची संख्या जर सलग ८ ते १० आढळून आल्यास त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत. आठवड्यातून किमान एका वेळेस तरी हेक्टरी २० ते २५ झाडांचे सर्वेक्षण करावे. नियंत्रण : 👉 पीक कळ्या, फुलांवर आल्यापासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मादी पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यास सुरुवात करतो. 👉 अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 👉 पहिल्या फवारणीनंतर विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. 👉 लहान अळ्या या कळ्या, फुलांना छिद्रे पाडून खातात. फुलगळीचे हे मुख्य कारण आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
4
संबंधित लेख