अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोवन
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र!
१) खपली गव्हास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान लागते. फुटवे फुटण्यापासून ते ओंबी भरेपर्यंत थंडीची आवश्‍यकता असते. खपली गव्हास साधारण १० ते २३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. २) खपली गहू काळ्या व कसदार जमिनीत चांगला येतो. हलक्या व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन मिळते. ३) खतमात्रा : उन्हाळ्यात शेणखत टाकले नसल्यास एकरी ४ ट्रॉली शेणखत मिसळावे. ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. वरखते देण्यापूर्वी माती परीक्षण करूनच खताचे प्रमाण निश्चित करावे. ४) बीजप्रक्रिया :बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. एक एकर पेरणीसाठी ४० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी १६ ते २० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
8
संबंधित लेख