अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोवन
बटाटा पिकामध्ये अन्नद्रव्याचे व्यवस्थापन!
• शेतकरी बंधूंनो, जमीन तयार करताना २५ ते ३० टन शेणखत अथवा १ ते २ टन एरंडी पेंड किंवा ३ टन कोंबडीखत यापैकी जे उपलब्ध असेल याचा वापर करावा. • रोगापासून कंदाचा बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ किलो प्रतिहेक्टर लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे. • ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार, बटाटा लागवडीपूर्वी १०० किलो नत्र,६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. • ५० किलो नत्र ३० ते ४० दिवसानंतर मातीची भर लावतांना द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
7
संबंधित लेख