सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
हरभरा आंतरपीक घेऊन वाढवा उत्पन्न!
➡️शेतकरी बंधूंनो,आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. मशागतीचा खर्च कमी होतो. ➡️जमिनीचा प्रकार आणि वार्षिक पाऊसमान लक्षात घेऊन आंतरपीक पद्धतीची निवड करावी. ➡️रब्बी हंगामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जमीन व पावसाचे प्रमाण यानुसार विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे. ➡️आंतरपीक पद्धतीत कडधान्य पिके निवडावीत. उदा. हरभरा हे आंतरपीक म्हणून निवडल्यास या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जीवाणू वातावरणातील नत्र जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करुन देतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. ➡️कडधान्य वर्गातील पिकांमुळे जमिनीची जैविक, भौतिक व रासायनिक सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. ➡️मध्यम व खात्रीच्या पावसाच्या भागात व भारी जमीनीत व जेथे जलधारणा शक्ती आहे अशा ठिकाणी रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके घ्यावीत. Image हरभरा+करडई आंतरपीक पद्धती :( ६ः३,४ः२,३ः१,२ः१) ➡️हरभरा+करडई पीक निव्वळ किंवा आंतरपीक पद्धतीत घेता येते. ➡️पावसावर अवलंबून असणाऱ्या भागात हरभरा+करडई (४ः२, ३ः१ किंवा २ः१) या प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. ➡️हरभरा+करडई ही एक चांगली आंतरपीक पद्धती आहे. एक तेलबिया पीक व एक कडधान्य वर्गातील पीक यात समाविष्ट आहे. ➡️यामध्ये हरभरा+करडई ६ः३ याप्रमाणेही लागवड करता येते. यामध्ये हरभरा पिकाची उत्पादन क्षमता तसेच चांगला दर यामुळे शाश्‍वत उत्पादन आणि चांगला आर्थिक फायदा होतो. ➡️लागवडीसाठी शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्‍टरी रोपांची योग्य संख्या ठेवावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
10
संबंधित लेख